मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
अक्षय्य त्रितिया दिवशी या ठिकाणी काढा १ स्वस्तिक..सर्व समस्या होतील दूर, धन वैभव सुख समृद्धी घरात येईल..

नमस्कार मित्रांनो..

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक शुभ दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.

जैन ध-र्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे. तसेच कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे.

या दिवशी सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान द्यावे. असे केल्याने आपल्या पितरांना शांती मिळते. या दिवशी सत्ययुग व द्वापार युगाचा प्रारंभ झाला, तसेच कृष्ण व सुदामा यांची भेट देखील याच दिवशी झाली, माता अन्नपूर्णेचा ज-न्म देखील अक्षय्य तृतीयेला झाला.

असे अनेक शुभ गोष्टी या दिवशीचा इतिहास सांगतात. अशा गोष्टींमुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. यावर्षी 14 मे ला शुक्रवारी अक्षय्य तृतीया आली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा बरसेल. या दिवशी हा छोटा उपाय जर केला तर आपल्यावरती येणारी सं-कटे निघून जातील, व्यवसाय, नोकरीत काही अडचणी जर असतील तर त्या निघून जातील.

जीवनातील सर्व स-मस्यांचे निराकरण नक्कीच या उपायांमुळे तुम्हाला भेटेल. म्हणून हा प्रभावी उपाय नक्की करा. आपलं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असते, कारण घराचं सं-रक्षण तिथूनच होते, चांगली, वाईट ऊर्जा तिथूनच येते. त्यामुळे आपण इथे आपल्या सं-रक्षणासाठी काही असे उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या घरात वाईट शक्ती, वाईट ऊर्जा प्रवेश करणार नाही.

त्यासाठी या अक्षय्य तृतीयेला थोडी हळद , कुंकू व गंगाजल व तांदळाचे पीठ घेऊन ते मिक्स करायचे व त्याने मुख्य दरवाजावरती शुभ चिन्ह स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक नीट सरळ काढा कारण तिरके स्वस्तिक आपली मती तिरपी करते. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा.

स्वस्तिक म्हणजे हे अतिशय शुभ चिन्ह मानले जाते, सकारात्मकतेने भरलेले असे हे स्वस्तिक त्याच्या चारही बाजुंनी शुभ ऊर्जा प्रदान करत असते. श्री गणेशाचे व माता लक्ष्मीचे प्रतीक हे शुभ चिन्ह स्वस्तिक मानले जाते. हा उपाय तुमच्या सर्व आर्थिक स-मस्या नक्की दूर करेल.

अशा प्रकारे ही अक्षय्य तृतीया तुम्हाला भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हरी विष्णू.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.