येणाऱ्या महिन्यात तिची ”पा ळी” चुकली…त्या रात्री दोघांच्यात जे झाले होते त्याचे परिणाम दिसत होते..पण पुढे त्या मुलीने जे काही केले..

नमस्कार मित्रांनो आज आपण एका वयात आलेल्या मुलीची व्यथा पाहणार आहोत. तर मित्रांनो आणि भगिनीनो तुम्हाला माहीतच असेल की असे म्हंटले जाते की १६ व वर्ष धो क्याचं असत अस म्हणतात हे काही खोट नाही. हे वयचं असं असतं…वाहत जाण्याचं. अशावेळी सावरलं नाही तर आयुष्यभरासाठी एक वाईट आठवण म्हणून ती लक्षात राहते, त्यातून कधीच ना बाहेर पडता येत ना त्या आठवणी कधी विसरतात.

तुम्हाला सांगतो मित्रानो आजची गोष्ट देखील अशाच एका वाईट आ ठवणींची, ही गोष्ट आहे रिया आणि समीरची. रिया आणि समीर दोघेही एका कॉलेज मध्ये शिकत होते आणि दोघेही इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते. ते आधी चांगले मित्र होते पण नंतर दोघांच एकमेकांवर खूप प्रेम झालं.

शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगला जॉब मिळे पर्यंत घरच्यांना आपले प्रेम प्रकरण सांगायचं नाही अस दोघांनी ठरवलेलं होत. दोघेही खूप समंजस होते. समीर रिया पेक्षा खुप मॅच्युअर होता, रिया तशी अल्लड होती. रियाचे घर कॉलेज पासून लांब होते, त्यांना एकत्र थोडा जास्त वेळ घालवता येईल म्हणून समीर रोज तिला घरी सोडायला जात असे.

त्यावेळी पावसाळ्याचे दिवस सुरू होते. दोघेही अभ्यासात हुशार होते. मन लावून शेवटच्या वर्षाची तयारी करत होते. त्यानंतर चांगली नोकरी मिळावी म्हणून आता चांगला अभ्यास करण आणि चांगले मार्क्स मिळवण खूप गरजेच आहे याची कल्पना दोघांना होतीच म्हणून कॉलेज नंतर कितीही टाईमपास केला तरी अभ्यासात जराशी देखील कसूर करीत नव्हते.

त्यावेळी पावसाळ्याचे दिवस सुरू होते. एक्स्ट्रा लेकचर असल्यामुळे उशीर होणार म्हणून दोघांनी घरी तसं सांगून ठेवलेलं होत. त्या दिवशी नोट्स पूर्ण करेपर्यंत संध्याकाळ झाली. पाऊस सकाळ पासून सुरु होताच, पण आता पावसाचा वेग वाढला होता आणि सोबत वा दळी वारा सुरू झालेला. घाईने दोघेही रे ल्वे स्टे शनवर गेले पाहतात तर पावसामुळे सगळीकडे पाणी साचल होतं आणि त्यामुळे सगळ्या ट्रे न्स रद्द केल्या गेल्या होत्या.

तसेच त्यामुळे रियाला भर पावसात आता र डू को सळले. समीरने तिला समजावले आणि आपली मावस बहिण स्टेशन जवळच राहत असल्याचे रियाला सांगितले. आपण आज रात्री तिच्या घरी राहू म्हणून समजावलं आणि रियाही यासाठी तयार झाली कारण तिच्याकडे दुसरा काही पर्याय ही नव्हता. तिने फोन करून घरी तसं सांगीतलं आणि दोघंही समीरच्या बहि‍णीच्या घरी राहायला गेले.

समीरच्या बहिणीच घर तिथून जवळच होत त्यामुळे दोघंही चालतच तिच्या घरी गेले, मात्र ती तिच्या घरी नव्हती. म्हणून समीरने तिला फोन केला आणि रिया आणि त्याच्या बद्दल सांगीतलं. “अरे समीर, मी कालच आईकडे आली आहे. पण मा‍झ्या घराची दुसरी किल्ली शेजारच्या लेले काकूंकडे आहे, तू त्यांना फोन दे मी त्यांना सांगते तुला किल्ली द्यायला.”असे सांगून तिने शेजारच्या काकूंकडून समीरला किल्ली मिळवून दिली.

समीर आणि रिया तिच्या घरी आतमध्ये गेले. दोघेच एकत्र रात्रभर इथे थांबायचं म्हणून रिया थोडी घाबरली होती. तिची अवस्था समजून तिला शांत केल, आणि फ्रेश होऊन ये म्हणून सांगितलं, ती येईपर्यंत त्याने तिच्यासाठी गरम गरम चहा आणि बिस्किट्स तयार ठेवले. चहा घेतल्यावर तिला थोड बर वाटल. गप्पांच्या ओघात त्याने तीच अवघडलेपण दूर केल.

बाहेर जोराचा पाउस, ढगांचा कडकडाट सुरु असताना अचानक लाईट गेली, रियाने घाबरून समीरला मिठी मारली. अरे,”वेडाबाई कशाला घाबरते, मी आहे ना” असे बोलून समीर तिला धीर देत होता. अशावेळी तारुण्याच्या उंबरठ्यावर दोघांचा तोल जाणे स्वाभाविक होते. समीर आपल्याशी नक्कीच लग्न करेल या आशेवर ती तिच सर्वस्व समीरला देवून बसली.

आपल्यामध्ये जे झाल ते स्वाभाविक होत अस मानून त्याची कोणतीही गिल्ट न बाळगता दोघे एकमेकांच्या अजून जवळ आले आणि त्यांनी त्या रात्री काम जी वनाचा अगदी मनसोक्त आनंद घेतला पण पुढच्या महिन्यात जे होऊ नये ते होऊन बसल.. पुढच्या महिन्यात रियाची तारीख चुकली, रियाला दिवस गेले. तिने समीरला हि बातमी सांगितली तेव्हा त्याला सुद्धा धक्का बसला. त्याने क्षणाचा देखील विचार न करता तिला ग र्भ पात करण्याचा सल्ला दिला.

त्याने तिची नीट समजूत काढली. आजून आपलं करिअर आहे, नोकरी आहे आताच आपण मुल बाळ, संसार यात अडकून बसून चालणार नाही. तिला देखील त्याच म्हणण पटल तिने सर्वांच्या न कळत ग र्भ पात केला. कोणालाही न सांगता सगळ्या या तना स हन केल्या. सगळ कस सुरळीत चालू होत. पण परवा अचानक दोन महिन्यांनी त्याच रियाला फोन आला, रिया मला आताच्या आत्ता भेट माझ्या बाबांची बदली झाली आहे.

त्यामुळे आम्ही सगळेच दुसरीकडे राहायला चाललोय आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी बाबा मला परदेशी पाठवणार आहेत. आता या नंतर आपण भेटू शकणार नाही, सो प्लीज आज मला भेट.

अरे पण मग आपल्या लग्नाचं काय? आणि आपण जी स्वप्न पहिली होती त्याचं काय? रिया र डवेल्या आवाजात विचारू लागली. ते सगळ आता शक्य नाही आज शेवटचं भेटू शकतो आपण तेही दहा मिनिटे त्याहून जास्त वेळ आता माझ्याकडे नाही असे समीरने सांगितले.

रिया जे समजायचं ते समजून गेली. कुठल्याही का, कशाला, कशासाठीची उत्तरे देण्यास समीर आता बांधील नव्हता आणि आपल्या नशिबाला दोष देण्या व्यतिरिक्त रियाच्या हाती दुसरा पर्याय नव्हता. म्हणूनच म्हंटल आहे, कोणतीही कृती करण्याआधी विचार केला पाहिजे. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *