नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच परकीय स त्तां च्या छा ताडावर पाय देऊन हे नवीन स्वराज्य स्थापन केले शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवण्यासाठी अठरा पगड जा तीतील मावळे लढत होते सर्व जा तींना स्वराज्य आपलं वाटतं होतं स्वराज्याच्या रक्षणासाठी जी व मुठीत घेऊन अगदी प्रा णपणाने ल ढणाऱ्या मावळ्यांच्या मदतीनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्र नाही तर अगदी सुरत पर्यंत मजल मारली.
मित्रांनो स्वराज्याची घोडदळ, पायदळ, आरमार ही दले ज्यांच्या माहितीवर आगेकूच करत होती ते खातं म्हणजे गु प्तहेर खाते. स्व राज्याच्या गु प्त हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक वे’षांतर करण्यात पटाईत होते श त्रूच्या गोटात जाऊन अगदी इतंभुत माहिती काढण्यात बहिर्जी नाईक निष्णात होते, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाण्याअगोदर बहिर्जी नाईक त्याठिकाणची सगळी माहिती काढत आणि ती माहिती महाराजांपर्यंत पोहोचवत त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धे काम सोपे होत असे.
बहिर्जी नाईकांच्या मदतीनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये यश मिळवले होते. बहुरूपी असलेले आणि नक्कल करणे, वेष बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना त्यांच्या कलेतील कौशल्य पाहूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा गु प्तहेर खात्याचे प्रमुख पद दिले होते. बहिर्जी नाईक हे फकीर वासुदेव कोळी भिकारी संत अगदी कुठलाही वेषांतर अगदी सहज करत होते.
ते विजापूरच्या आदिलशाह आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात देखील वेषांतर करून जात आणि खुद्द आदिलशाह आणि औरंगजेबाकडूनच पक्की माहिती घेऊन येत असत. आपण गु प्त हेर असल्याचा सं शय जरी आला तरीही आपली क त्तल होणार हे माहीत असताना देखील बहिर्जी नाईकाना उभ्या आयुष्यात कधीच कोणी पकडू शकले नाही.
यातच त्यांची बु’द्धीमत्ता आणि चा’तुर्य दिसून येते. स्वराज्याच्या गु प्त हेर खात्यात जवळपास तीन ते चार हजार गु प्त हेर असायचे या सगळ्यांचे ने तृत्व बहिर्जी नाईक करायचे हे सर्व गु प्त हेर नाईकांनी विजापूर दिल्ली कर्नाटक पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्याचा कडेलोट केला जात असे त्यामुळेच हेर खात्याने दिलेली अगदी अचूक आणि बरोबर असे बहिर्जी नाईकांनी गुप्तहेर खात्याची जणू एक भाषाच तयार केली होती.
ती फक्त बहिर्जी नाईकांच्या गु प्त हेरांनाच समजत असे आणि छत्रपती शिवाजी महाराज या गु प्त हेर खात्याची भाषा समजू शकत होते. त्यात वाऱ्यांचे आवाज असत कुठलाही संदेश द्यायचा असेल तर त्याच भाषेत दिला जात असे महाराज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जी नाईकांना माहीत असे आणि म्हणूनच महाराज त्याठिकाणी जाण्याआधीच तिथली सगळी खडानखडा माहिती बहिर्जी नाईक काढत आणि महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवत असे.
असे म्हटले जाते महाराजांच्या दरबारात जर बहिर्जी नाईक वेषांतर करून आले तर त्यांना फक्त महाराजच ओळखू शकत होते म्हणजे काय तर दरबारात बहिर्जी नाईक कोणी व्यक्ती नाही अशीच सर्वांची समजूत होत असे. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर उत्तम लढवय्या देखील होते. तलवारबाजी आणि दांडपट्यात ते माहिर होते कारण गु प्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागे.
यामुळेच बहिर्जी नाईकांना तलवारबाजी आणि दां ड पट्टयाच देखील उत्तम ज्ञान होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला जाणार होते त्यावेळी औ रंगजेब दगा फटका करणार आहे ही माहिती देखील बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गु प्तहेरांनी आधीच शिवरायापर्यंत पोहोचवली होती म्हणूनच आग्राच्या भेटीमध्ये शिवराय आधीच सावध झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि संभाजी महाराजांच्या सोबत काही दगा फ टका होऊ नये यासाठी बहिर्जी नाईकांनी पूर्ण काळजी घेतली होती बहिर्जी नाईकांनी आपले ४५० गु प्तहेर वेगवेगळ्या वे शात दिल्ली आणि आग्राच्या कानाकोपऱ्यात पसरवले होते महाराज आग्र्याला जाण्या अगोदर महिनाभर आधीच बहिर्जी नाईकांचे गुप्तहेर दिल्ली मध्ये फिरत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेत गु प्तहेर म्हणुन बहिर्जी नाईकांचा सहभाग असायचा. अफजलखानचा व ध पन्हाळ्यावरून सुटका शाहिस्तेखानाची बो टे का पणे पुरंदरचा तह सुरतची लूट अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचं अर्ध काम पूर्ण करत असत स्वराज्याचे गु प्तहेर प्रमुख आणि छत्रपतींचा तिसरा डोळा अशी ज्यांची ओळख होती.
त्या बहिर्जी नाईकांचा मृ त्यू नेमका कसा झाला याविषयी अनेकांना माहीत नाही बहिर्जी नाईकांचा मृ त्यू विषयी इतिहासात उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार ल ढाईत ज खमी झालेले बहिर्जी नाईक सांगली जिल्ह्यातील बानुर गडावर आले ज खमी अवस्थेतच ते काही काळ बाणुर गडावर राहिले आणि तिथेच त्यांचा मृ त्यू झाला महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बानुर गड म्हणजेच भूपाळ गड आहे हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे.
याचं बानुर गडावरती स्वराज्याचे गु प्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची स माधी आहे इथेच बहिर्जी नाईकांनी अखेरचा श्वास घेतला होता. जोपर्यंत बहिर्जी नाईक जि वंत होते तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या सोबत कधीही दगा फ टका झाला नाही. एक मात्र नक्की जर बहिर्जी नाईक जि वंत असते तर छत्रपती संभाजी महाराज कधीच मुघलांच्या हाती लागले नसते.
कारण संभाजी महाराज पकडले जाण्यापूर्वीच बहिर्जी नाईकांचा मृ त्यू झाला होता आणि म्हणूनच संगमेश्वरात मोघल संभाजी राजेंना कै द करू शकले स्वराज्याचे गु प्त हेर प्रमुख आणि छत्रपतींचा तिसरा डोळा अशी ओळख असणाऱ्या बहिर्जी नाईकांच्या शौर्य क र्तु त्व आणि पराक्रमाला कधीच कोणी विसरू शकत नाही. जय भवानी जय शिवराय.