एक मिनिटांत भरलेले चोंदलेले बंद नाक मोकळे, फुफुस स्वच्छ,सर्दी खोकला कफ घरगुती उपाय

नमस्कार आपले स्वागत आहे. मित्रांनो आजचा उपाय अत्यंत गुणकारी असून प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी या उपायाची गरज पडतेच. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना सर्दी खोकला कफ याचा त्रास होतो. सर्दी जास्त झाली तर एक नाक बंद होतं किंवा नाकपुडी बंद होते. कधी कधी पूर्ण नाक बंद होत आणि श्वास घ्यायला अडचण येते. अशा वेळेस आपण काय करतो की ड्रॉप वापरतो आणि नाक मोकळे करतो मात्र त्यामुळे घसा दुखतो किंवा घशाची इतर इन्फेक्शन्स होतात. घशाला त्रास होतो. अशा वेळेस घशाचा त्रास कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे नाक भरलेले नाक मोकळे करण्यासाठी सायनस सर्दी छातीतील कफ कमी करायचा असेल एवढेच काय स्वच्छ करून प्रतिकारशक्ती वाढवायचे असेल तर हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.
हा पदार्थ आहे निलगिरी. हे झाड उंच स्वरूपाचे असते तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी निलगिरी चे झाड पाहिलेलंच असणार आहे हे अत्यंत उपयुक्त आहे आणि यापासून एक प्रकारच तेल काढलं जातं. ते तेल आपल्याला वापरायच आहे. तुम्ही जेव्हा विक्स किंवा झेंडूबाम वापरतात आणि नाक भरलेल असत अशा वेळेस नाक मोकळ व्हायला साधारणता दहा ते पंधरा मिनिट किंवा अर्धा तास लागतो त्याहीपेक्षा हे जे तेल आहे याचा जर वापर केला तर साधारणतः दोन ते पाच मिनिटांमध्ये तुमचं नाक झटपट मोकळे होतं.
घशाच इन्फेक्शन पण कमी होतं आणि छातीतला कफ कमी करण्यास मदत होते. मित्रांनो हे जे निलगिरी तेल आहे ते फक्त साचलेला कप कमी करून त्यात जे व्हायरस आहेत किंवा जे जिवाणू आहेत यांना प्रतिरोध करण्यासाठी प्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं काम करतात मित्रांनो हे इतकं प्रभावी आहे की ज्या व्यक्तींना निमोनिया झाला आहे अशा व्यक्तींच्या छातीला जर याची मालिश केली तर याने देखील आराम मिळतो.
निमोनिया कमी होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे जो खोकल्याचा प्रकार आहे तो देखील कमी करण्यासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहेत. मित्रांनो आता याचा वापर थोडक्यात समजावून घेऊ. बघा हे तेल बाजारात सहज उपलब्ध होत. हे तुम्ही घरी घेऊन यायचं आणि कापसाचा छोटासा गोळा किंवा कापूस थोडासा घ्यायचा त्यावरती दोन-तीन थेंब टाकायचं आणि नाकापाशी ते त्याचा वास घ्यायचा किंवा नाकाच्या जवळून ते घेऊन जायचं त्यामुळे ते नाकात जातं आणि त्याचा परिणाम दाखवत.
पंधरा वर्षाच्या पुढची व्यक्ती आहे त्याच्या नाकामध्ये दोन दोन थेंब टाकू शकतात. जे नाक ब्लॉक झालं ते केवळ दोन ते तीन मिनिटांमध्ये मोकळे होईल. अशा प्रकारच आहे इतकं परिणामकारक आहे. निलगिरी तेल बाजारात मिळाले नाही तर मग याचे पाणी तुम्ही वापरू शकतात. काय करायचं की पंधरा वीस पाने याचे आणायचे आहे. एक पात्र्यात उकळवायचे आणि त्या पाण्याची वाफ घ्यायची आहे.
चांगल्या परिणामासाठी त्यात कडुलिंबाची दहा-बारा पाने देखील टाकून वापरू शकता. हे वाफ तुम्ही दोनदा घेऊ शकता. दोन-तीन-चार वेळा करू शकतात याला कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि तीन ते सात दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे. फक्त ज्या व्यक्तींना फक्त निलगिरी तेलाचीच ऍलर्जी आहे अशा व्यक्तीने ते वापरू नये त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.