नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आजच्या कलयुगामध्ये कोणीही कोणाचे राहिले नाही असे म्हणता येईल अश्याच एका म्हातार्या आई वडिलांची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. भर गारठ्यात भल्या प हाटं म्हा तारी चुलीत चिपाड ढकलत व्हती,पर गारठ्यान वली पडलेली चिपाड दमवायला लागली, सगळीकडं धुराचा आ’गडोंब झाला. नाका-तोंडात जाणाऱ्या धुरानं म्हातारीचा जीव घुटमळला अन् म्हातारी खोकू लागली.
तिचा आवाज ऐकून वसरीत कलंडलेल म्हातार उठुन बसलं अन् को पऱ्यात पडलेली एक-दोन कागदं अन् एक फाटकी चिंधी घेऊन म्हा तारीकडं गेलं. लगबगीन आणलेली कागद अन् चिंधी चुलीत घालुन फुकणीनं फुकायला लागलं तसं चुलीत जा’ळ झाला. म्हा तारीला हाय सं वाटलं. मग म्हातार बसलं ऊ बीला शेकत. अजुन पोरं-सुना नातवंडासंग निजली होती.
म्हा तारं जरा गप गपच व्हतं. म्हाताऱ्याला असं गप बघुन म्हातारीनं हेरलं. काय वं धनी आज रातभर कुस बदलत व्हता, निजला नायत अजाबात, तुम्ही असं रात रात जागुन काय व्ह नार हाय आज हु णार्या वाटण्या काय थांबणार हायत्या का? भावकीपुढं अन् गावातल्या चार पंच मं डळीपुढं पोरं ज्यो तमाशा करणार हायत त्यो काय थांबणार हाय का?
तर म्हा तारीनं डोळ्याला प दूर लावला. तसं म्हा तार हातात मिसरी घेत बोलतं झालं. सगळं कळतयं गं दुरपते, पर आपलं सारं आयुष गेलं काडी काडी जमवायला अन् आज त्याची वाटणी व्हणार. घर,दार,श्यात सगळ्याच तुकडं व्हणार. जीव तु’ट तु या बघं. जग रीतच हाय आपल्यात तर काय येगळं व्हतयं. म्हाताऱ्याचं बोलणं ऐकुन म्हातारी बोलती झा ली, पर त्या प रड्यातल्या इठो बा अण्णा अन् बायजा म्हातारी सारखं आपल्या दो घां स्नी बी पोरांनी वाटुन घेतलं तर उद्या पासन चु लीत घालायला.
का गद-चिं ध्या मला कोण आणुन द्याच दोघंबी एकमेकांकड बघत राहिली दुपारी बैठक बसली सारी पंच मंडळी गोळा झाली, शेजारी-पाजारी सारेच जमले. कोपऱ्यात म्हातारं बी उभा व्हतं. आत चुलीपशी डो क्यावर पदर घिऊन म्हातारी आंवढे गिळत बसलेली पोरं आपाआपली मतं मांडत व्हती सगळीच तर जमली. पर धाकटी सुन कुठंच दिसतं नव्हती थोरली हातात गोळ्या अन् पाण्याचा गलास घिऊन आली, पुढं व्हतं बोलती झाली, वाईच थांबता का. आ
मच्या दा दां स्नी साखर हाय गोळ्या आधी खाऊदेत मग तुम्हाला अजाबात अडवायची नाय म्या. डोईवरचा पदर तसाच व्हता अन् हात म्हाताऱ्यापुढं नेत दा दा स्नी तीनं गोळ्या दिल्या म्हा ताऱ्याला असं गप बघुन तिच्या बी काळजात धसं झालं डोळ्यांत आसवं आली पर बोलणार काय ती नवर्यापुढं हतबल व्हती पं च मंडळींना सुनेच कौतुक वाटलं पण ही दोन पोरचं ऐकत नव्हती.
एकमेकांच्या अंगावर पळुन पळुन जात व्हती. म्हा ताऱ्याचं मो तिं बिदूच आपरेशन अन् म्हातारीचा झ टका त्यासाठी गेलेला पैसा सगळं सगळं पोरांनी वकुन काढलं व्हत. तर हे ऐकुन म्हातारे आई-बाप तिळ तीळ तु’टत व्हते धाकला बोलता झाला, म्हातारी माझ्याकडं असुदेत, माझ्या बायकोला वाईच तेवढीच मदत करलं. नीट-वाट करलं साळुता फिरवलं पाणी तरी तापवलं त्यावर थोरला बोलला, म्या बी तीच बोलणार व्हतो, म्हातार असुदेत माझ्याकडं, मी जातो कामावर मग चि न्याला अन् पिंकीला शाळतं तरी सोडुन येईल, येताना कालवणाला कायतर आणलं दळाण ठेवायलं जाईल कधी नव्ह ती दोघा भावांच एकमत झालतं.
आय धाकट्याने अन् बाप थोरल्यानं वाटुन घेतलावत. त्यांच बोलुन ऐकुन आयनं मोठ्यानं हं ब रडाच फोडला. आत्तापातुर एकवटल्याला साराच धीर सुटला व्हता म्हातार बी हळवं झालतं का पर्या आवाजातं एवढचं बोललं. बघतोयसं नव्ह पां डुरंगा,हीच घटका दावायची हुती तर उचलायच व्हतसं का आधीच. तसं आत उभी थोरली सुन सासर्याजवळ येऊन म्हातार्याच पाय धरुन हमसुन रडायला लागली. पंचाचा निर्णय झाला सगळ्या वाटण्या झाल्या.
सरपंच बोलले,पोरांनी ठरवलयं तसच होईल आई..तोवर एवढा वेळ गायब असलेली धाकटी सुन आली,रागाने ला लबुंद झाली होती,दुर्गाच अवतरली व्हती म्हणा की,सगळी मंडळी अवाक झाली, सगळीकडं शां तता पसरली अन् धाकली बोलती झाली काय सरपंच आय काय? आय-अन् बाप काय वस्तू हायत्या का वाटायला, अन् वाटायचंच असलं तर, बाकी सगळं वाटुन द्या आय-बाप अजाबात वाटायचं नायती.
ती दोघंपण मा झ्या संगट राहणार मी जित्ती हाय तवर कोण त्यांच्या वाटण्या करतयं म्या बी बघतेच सरपंच बोलले, अहो वहिणी,पर तुमच्याच नवर्याने अन् दिराने वाटण्यात आपआपली पसंती सांगितल्या आम्ही तसचं करतुया. तशी धाकली कडाडली, त्या दोघांस्नी खायाचं हाय न्हवं सवत खुशाल खाऊद्या, म्या माझ्या आत्या-मामंजीसंग त्यांच्याच घरात राहणार हाय.
मला माहितीये थोरल्या बाईंना बी हेच पाहिजेल मामंजीचे धरलेले पाय त्याचीच सा क्ष हाय आव,आज माझा नवरा अन् दीर मोठं झालीती अन उंदरा-मां जरासारखी भां डायला लागलेली पर त्यांच्यासाठी माझ्या आत्या-मा मंजींनी लय ख स्ता खाल्लेत्या. आवं,वन्स जशा घरात वावरतेत्या तसं माझ्या अन् थोरल्या बाईंच्या ल ग्ना पासन आम्ही दोघी बी वावरतुय.
आत्या मा मंजी आमचे सासु-सासरं हायती, आय-बा हायती असं म्या म्हणणार नाय परं माझ्या आय-बा ला असं माझ्या भावांनी वाटल्यालं मला जसं आवडणार नव्हतं तसंच माझ्या आ त्त्या-मामंजीना वाटलेलं मी कधी बी सहन करायची नाय. तीचं बोलणं ऐकुन थोरली पुढं आली, न वर्याला बोलली, म्या च धाडलं व्हतं धाकलीला कचेरीत सकाळी, काडीमोडाचं कागाद आणायला,आम्ही दोघी बी काडीमोड घेतोय आज, मग राहा तुम्ही दोघं खुशाल वाईलं.
आम्ही दोघी बी आत्त्या-मामंजीच्या पायाजवळचं राहणार कायम. तसं आत बसलेली म्हातारी पळतचं बाहीर आली अन् दोघी सुंनास्नी बिलगली. सुना नायसा पोरींनो लेकीचं हायसा आमच्या. दोघी सुनांच्या डोक्यावरनं आज हात फिरवताना म्हाताऱ्याच्या बी थकल्या पापण्यांनी वाट मोकळी केली. अन् मो ति बिंदु झालेले ते डोळेही आनंदाच्या भरात बरसुन गेले.
अन् इकडं मघापासून वचावचा भांडत राहणारे,एका एका भांड्यासाठी पिरपीर करणारे हे दोघे भाऊ आपआपल्या माना तशाच खाली घालुन गपचुप उभे होते. आज सुंनानी सिद्ध केलं होतं पुर्वापार चालत आलेल्या समजुती चुकीच्या असु शकतात, सुनांमुळे मुलं वेगळी राहतात, अन् सुंनामुळे कुंटूंब दुंभंगतात. सगळंच पोरींनी खोटं ठरवलं होत.