नमस्कार मित्रांनो आणि भागीनिनो आज आपण नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरिहर गड किंवा हर्षद नावाचा दुर्ग-प्रेमींचा एक अतिशय आवडता असा किल्ला आहे. नाशिक पासून पश्चिम दिशेला साधारणतः ४० किलोमीटर अंतरावर आणि त्रंबकेश्वर पासून साधारणतः १० ते १२ किलोमीटर अंतरावर हरिहरगड म्हणजे एक अतिशय देखणा आणि दुर्गम किल्ला आहे.
मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल या किल्ल्याचं नाव म्हणजे हरिहरगड पण छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव बदलून हर्षगड असं ठेवलं होतं. महाराजांनी या किल्ल्याचं नाव का बदललं होतं या मागची कहानी मजेदार आहे.
एका सामान्य वयस्कर स्त्री-च्या असामान्य बु-द्धी-मत्तेची मोठी कर्तबगारी ह्या कहानी मागे आहे. हा त्रंबकेश्वर जवळचा हरिहरगड ! म्हणजे त्याकाळी महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणारा उत्तर भारताकडे जाणाऱ्या गुजरात खडक आणि उत्तर कोकणात उतरणार्या महत्त्वाच्या रस्त्यांवर नियंत्रण ठेवणारा एक महत्त्वाचा किल्ला होता. याचा बाले-किल्ला जरी छोटा असला तरी ल’ष्करीदृष्ट्या या किल्ल्याचं महत्त्व स्वराज्यासाठी फार मोलाचं होतं.
मित्रांनो त्यावेळी १६८० च्या दशकामध्ये मोगल बादशहा औरंगजेब आपली ४५ लाखांची फौज घेऊन महाराष्ट्राला घेरण्यासाठी उतरला होता, तेव्हा त्यांनी मोगलांना उत्तरेकडून मिळणारी रसद उत्तरेकडच्या रस्त्यावरचे सगळे मोक्याचे किल्ले ताब्यात घेण्याचा आदेश आपल्या सरदारांना दिला होता आणि त्या वेळी या हरिहर गडावर स्वराज्याचे जेमतेम दोनशे एक मावळे तै’नात होते. मुघलांचा एक अतिशय मातब्बर सरदार आपली हजारांची फौ’ज घेऊन त्या किल्ल्याजवळ तळ ठोकून बसला होता. त्या मोगल सरदारांने हरि-हर गड किल्ल्याची रसद रोखली होती आणि चारही बाजूंना घेराव घातला होता.
मित्रांनो किल्ल्यावर असणारे शे-दोनशे मावळे आत मध्ये कोंडले गेले होते त्यावेळी चारही दिशांना मुघलांची लाखोंची फौज महाराष्ट्रभर पसरली होती त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसाठी हा काळ फारच आ’णी’बा’णी’चा होता. प्रसंग मोठा बाका होता आणि या धामधुमीच्या काळात या छोट्याशा हरि-हरगड वर असणार्या चिमुकल्या शे दोनशे मावळ्यांना दा’रु’गो’ळा किंवा धान्य पोहोचवणं महाराजांसाठी ही फार अवघड होतं पण या किल्ल्याला नैसर्गिक दृष्ट्या फार मोठ सं’रक्षण लाभलेलं आहे. या किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे.
अशा तीनही बाजूंना चारशे ते साडेचारशे फुटांचे नैसर्गिक ताशीव असणारे कडे आहेत दुरून जर हा किल्ला पाहिला तरी या किल्ल्याला पायऱ्याच नाहीत असं वाटतं. या किल्ल्याची निर्मिती सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जुन्नर वरून राज्य करणाऱ्या सातवाहन राजांनी केली होती, छाती दमून टाकणारी उभी चढण असणाऱ्या कातळकोरीव अरुंद पायर्या म्हणजे या किल्ल्याचं वैशिष्ट्य. या कातर दगडामुळे या हरिहर किल्ल्यावर चढाई करून वर जाऊन तो जिंकण केवळ अशक्य गोष्ट होती. फक्त एकच वाट आणि एक छोटासा दरवाजा,
मित्रांनो आणि जर या किल्ल्याचा दरवाजा फक्त एकाच मावळ्यांन जरी रोखून धरला तरी शत्रूची हिम्मत पुढे जाण्याची होऊ शकत नव्हती. तो मुघल सुभेदार जरा हुशार होता, त्या मोगल सरदारांन हरिहर गड किल्ल्याचा हे वैशिष्ट्य ओळखलं होतं म्हणून त्याला शहाणपणाचा निर्णय असा घेतला की किल्ल्यावर चढाई करत वाटचाल करून जायचं नाही. फक्त किल्ल्याच्या रसदीचे सगळे रस्ते रोखून धरायचे , त्या मोगल सुभेदाराला अशी खबर मिळाली होती की किल्ल्यावर धान्य आणि माणसं फार कमी आहेत.
दा’रु’गो’ळा आणि धान्य पुरवठा झाला नाही तर केवळ महिन्या दोन महिन्यातच ते सगळं त्याने संपेल आणि आतले सगळे सै’निक उपासमारीमुळे एकतर शरण तर येतील नाहीतर चवताळून बाहेर ल’ढायला येतील. झालं ही जवळपास तसंच, सुमारे एक दोन महिन्यातच किल्ल्यावरचा दाणागोटा संपत येऊ लागला किल्ल्यावर तसा दा’रु’गो’ळा ही फार मोजकाच, बाहेरून ताज्या दमाची माणसं किंवा शिबंदी दाणागोटा मिळण्याची आशाही फार काही दिसत नव्हती आणि त्या धामधुमीच्या काळात त्या लोकांनी तशी अपेक्षा करणं चुकीचं होतं.
मित्रांनो तुम्हाला सांगतो किल्ल्यावरील मावळे अर्धपोटीच होते आणि एक दिवस किल्लेदारानं निर्णय घेतला की अर्ध्या १०० या लोकांनी खाली उतरून अचानक मुघलांवर ह-ल्ला करून त्यांचा विळखा तो’डायचा प्रयत्न करायचा आणि मग त्यांच्या सरदारांच्या पर्यंत निरोप पाठवायचा की तिकडे दुर्लक्ष झालेल्या हरिहर गडाला मदत पोहोचू शिबंदी पोचवा. रसद पोहोचविता येईल, जर या प्रयत्नात मावळे यशस्वी झाले तर हा मोक्याचा किल्ला राखता येईल आणि जर अयशस्वी झाले तर खाणारी निम्मी तोंड तरी कमी होतील या आशेने किल्लेदारांनी तसा निर्णय घेतला होता आणि मग ठरल्याप्रमाणे एका अंधार्या रात्री सुमारे शंभर मावळे जोरदार ह-ल्ला केला पण तो मुघल सरदार फार सावध होता.
त्याला मराठे असा ह-ल्ला करतील अशी अपेक्षा होतीच, मोगल सै’निकांनी मावळ्यांना पराभूत केलं, उपाशीपोटी असणारे मावळे निकराने ल-ढले पण दुर्दैवाने सगळ्यांना वीर मरण प्राप्त झालं. एकदा सकाळच्याला मो’गलाच्या सै’निकांना उष्ट्या पत्रावळ्या गोळा करून मोजताना समक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलय, वय झालंय पण नदर शाबूत हाय अजून, त्यावरती किल्लेदार विचारात पडला, पण म्हातारीला नेमकं काय सांगायचं याचं त्याला काही कळत नव्हतं.
किल्लेदार आपल्या मिशीवर ताव देत म्हणाला माझी माय, चांगली डोकेबाज हाय ग तू, पण काय म्हणतीया ते तर सांग. त्या आजीनं किल्लेदाराला एक युक्ती सांगितली, त्या रात्री किल्ल्यावर मोठा जल्लोष साजरा केला गेला, हरिहर गडावर तो’फांचा व बं’दुकांचा गो ळी बा र दा’रूची आतिषबाजी केली, सगळेजण किल्ल्यावर अगदी मोठ्या आनंदाने आणि जल्लोष आणि ओरडत होते. किल्ल्यावर चे सगळे मराठे अगदी मोठ्या आनंदाने किंचाळत होते, ओरडत होते, हिरा घालून बसलेले सै’निक आता फार गोंधळले.
या मराठ्यांना नाचायला, उत्सव साजरा करायला नेमकं घडलं तरी काय, हे त्यांच्या बुद्धीच्या बाहेरच होतं. त्यांच्या काही लक्षातच येत नव्हतं. त्या दिवशी सकाळी मोगलांच्या गु’प्त’हे’रां’नी कड्यावरून खाली पडलेल्या उष्ट्या पत्रावळ्या मोजल्या त्यात तब्बल ५०० – ६०० च्या वर भरल्या. तेव्हा तिथल्या मुघल सुभेदार असा निष्कर्ष काढला की वर आता पाचशे-सहाशे माणस आहेत तेव्हा मात्र त्या मोगल सरदारांना चक्करच आली, या गोष्टीचा अर्थ असा होता कि किल्ल्यावरच्या मराठ्यांना कुठून तरी एका रात्रीतून रसद शिबंदी नव्या दमाची नव्या जोमाची माणसं येऊन मिळाली होती.
चारही बाजूंनी आपला घट्ट विळखा असताना ही जादू कशी काय नेमकी झाली? हे काही त्या सरदाराच्या लक्षातच येत नव्हतं. मराठ्यांना भु’ताटकी किंवा का’ळी जा’दू येते की काय किंवा आपल्यापैकीच कुणीतरी आतून मराठ्यांना फितूर झाला की काय आणि त्यांना वाट दिली की काय हेही समजायला बिलकुल रस्ता नव्हता आणि अतिशय बेला कठीण कातळ अशा हरिहर गडाच्या कातळ अशी चक्रा करूनही काही उपयोग झाला नसता, केवळ मोगलांच्या डोक्याला टेंगुळ झाली असती.
त्यानंतर एक-दीड महिन्यात पावसाळा ही सुरू होणार होता, नाशिक त्रंबकेश्वरच्या या परिसरातल्या पावसाची द’हशत फार प्रचंड होती आणि त्या काळी या पावसाला ते फार घाबरायचे. कोसळणार्या सह्याद्रीच्या त्या पावसात मोगलांच प्रचंड आणि अतोनात हा’ल झाले असते असा सगळा विचार करून त्या मोगल सरदारांना असा निर्णय घेतला की या हरिहर गडाचा वेढा उठवायचा कारण वेढा घालून काही उपयोग नाही आणि मग त्याने वेढा उठवला आणि तो परत औरंगाबाद कडे निघून गेला.
एका सामान्य आजीबाईंच्या युक्ती मुळे १०० मावळ्यांची प्राण आणि हरिहर गड मोक्याचा स्वराज्याचं किल्ला वाचला होता. छत्रपती संभाजी महाराजांना या घटनेची माहिती कळाली तेव्हा मावळ्यांनी हर्षोल्लास करून किल्ला वाचवला म्हणून या किल्ल्याचं नाव स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी हर्षगड असं ठेवलं. किल्ल्या जवळ असणाऱ्या टाकी गावाचे नावही महाराजांनी टाकीहर्ष ठेवलं होतं एवढंच नव्हे तर नंतरच्या काळात त्यांनी स्वतः हरिहर गडाला आले आणि त्या आजीबाईचा मोठा सन्मान आणि सत्कारही केला होता.
हर्ष गडावरच्या आजीबाईंचा युक्तीची ही कहाणी त्रंबकेश्वरच्या भागात प्रसिध्द आहे. पण महाराष्ट्राला फारसी परिचित नाही, फलटण मधील माननीय डॉ’क्टर जगदीश पाटील यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकाचे पान क्रमांक १५९ पान क्रमांक १६० यांवर या हर्षगडाच्या आजीबाईंच्या युक्तिची कहाणी सांगितली आहे.