हरतालिका व्रत कोणत्या वयात करावे, अविवाहित की विवाहित पूर्ण माहिती जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो, महादेव पती म्हणून मिळावेत म्हणून पार्वती मातेने केलं होतं हरतालिकेचे व्रत. हेच व्रत आज घरोघरी स्त्रिया करत असतात, यंदा ही हरतालिका १८ सप्टेंबरला आलेली आहे.
पण हे व्रत नेमक कोणी करावं बरं? कुमारीकांनी करावं का किंवा फक्त सुवासिनीने करावं ? त्याचबरोबर वयाच्या कोणत्या टप्प्यापासून सुरू करावं? एखाद्या भगिनीचे पती हयात नाहीये तर ती हे व्रत करू शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओ जाणून घेवूया, यासाठी हा विडीओ अगदी शेवटपर्यंत पहा.
हरतालिकेचे व्रत घरोघरी केलं जातं. अगदी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही केलं जातं. हे व्रत शिवपार्वतीला समर्पित आहे. या व्रतामध्ये वाळूची किंवा मातीची महादेवांची पिंड बनवली जाते. बाजारात पार्वती माते सह सखी किंवा बाजारात हल्ली पार्वती माते सह सखीच्या मूर्तीही विकत मिळतात त्याही आणून पूजा केली जाते.
पूजा कशी करायची हे तर कळलं पण, ही पूजा कोणी करायची वयाच्या कोणत्या टप्प्यापासून सुरू करायची, हे आता आपण जाणून घेऊया. तर मंडळी हरतालिका हे व्रत अस आहे की सगळ्या स्त्रिया हे व्रत करू शकतात, म्हणजे अगदी कुमारीका, सवाष्ण ते अशा भगिनी ज्यांचे पती हयात नाहीत, त्यासुद्धा स्त्रिया हे व्रत करू शकतात. या व्रताचे हेच तर वैशिष्ट्य आहे. आता कुमारिका मुली हे व्रत का करतात तर त्यांना चांगला पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात.
सुवासिनी भगिनी, आपल्या जोडीदाराला आपल्या पतीला सौभाग्य लाभाव, त्याच बरोबर दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत करतात. त्याच बरोबर ज्या भगिनींचे पती हयात नाहीयेत त्या सुद्धा हे व्रत करतात शिवपार्वतीची आराधना म्हणून. त्यामुळे आता हे तर स्पष्ट झालं की सगळ्या स्त्रिया हे व्रत करू शकतात. पण हे व्रत स्त्रियांनी वयाच्या कोणत्या टप्प्यापासून सुरू करावं? तसं त्याला वयाच बंधन नाही तुम्ही कोणत्याही टप्प्यापासून हे सुरू करू शकता.
साधारणतः महाराष्ट्रामध्ये अगदी घरात मुली लहान असल्यापासूनच त्यांना हे व्रत करायला सांगितलं जातं. अगदी वयाच्या पाच सहा वर्षांपासून सुद्धा मुली आईबरोबर ही पूजा करतात आणि हे व्रत करत असतात. पण तसं काही बंधन नाही तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यापासून हे व्रत सुरू करू शकतात. एकदा व्रत सुरु केल्यानंतर मात्र ते व्रत दरवर्षी नित्य नियमाने करायच असत.
या व्रतामधे महिला कडक उपवास करत असतात, म्हणजे अगदी काही जण दिवसभर निर्जळ उपास करतात किंवा फळ खाऊन उपवास करतात. पार्वती मातेने झाडाची पिकली पान खाऊन हा उपवास केला होता असं त्या कथेमध्ये सुद्धा येत.
पण जेव्हा लहान मुली हे व्रत करतात तेव्हा मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा कडक उपवास करायला लावला जात नाही. मुलींना उपवासाचे पदार्थ खाऊन त्यांना जसा त्यांना होईल तसा त्याप्रमाणे ही पूजा आणि हे व्रत करायला सांगितलं जातं, कारण लहान वयापासूनच मुलींमध्ये हा संस्कार रुजावा म्हणून. मुलींसाठी उपवासाचे कोणतेही कडक नियम नाही.
पण महिला मात्र त्यांच्या तब्येतीला होईल तसे त्याप्रमाणे उपवास करू शकतात. तसेच माहितीपूर्ण विडीओ आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा, असेच शास्त्रीय धार्मिक माहिती रोज पाहण्यासाठी आमचे पेज नक्की फॉलो करा, धन्यवाद.