मित्रांनो, मुळव्याध हा बऱ्याच प्रकारचा असतो. त्या प्रत्येक प्रकारावर आज आम्ही तुम्हाला एकदम जबरदस्त आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. सर्वात प्रथम मूळव्याधीचा अत्यंत त्रासदायक जो प्रकार असतो त्या प्रकारासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि तो म्हणजे “कोंब” किंवा “चुंबळ”. हा जो प्रकार मुळव्याधीचा बाह्य प्रकार आहे,
यामध्ये प्रचंड वेदना होतात, बसता-उठता येत नाही. या मूळव्याधीची जी वनस्पती आहे याला “उतरण” किंवा “साडोराणी” असं म्हटलं जातं. ही वनस्पती तुम्हाला ॲमेझॉन किंवा कुठल्याही प्रकारच्या आयुर्वेदिक दुकानावर सहजरित्या उपलब्ध होते. याच्या पानाचे चूर्ण आपल्याला उपलब्ध होतं. ही जी वनस्पती आहे या वनस्पतीची पाच ते सहा पाने उकळून घ्यायची आहेत.
त्यानंतर पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्याच्या जो अर्क बनलेला आहे या पाण्याने तो भाग धूवून काढायचा आहे. हा उपाय आपल्याला झोपताना करायचा आहे. या वनस्पतीचे पूर्ण औ-षधी गुणधर्म जे आहेत ते त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात. या पाण्याने धुतल्यामुळे त्याचे जे स्नायू रिलॅक्स झालेले असल्यामुळे ते गळून जातात.
२१ दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ही एक अत्यंत प्रभावी वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये नावाजलेली वनस्पती आता तुम्हाला र’क्ती मूळव्याध असेल, र’क्त पडत असेल तर हा जो मूळव्याध आहे तो अंतर्गत मूळव्याध असतो. त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही एक वेळेस केला की, तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही र’क्त पडण्याची सम’स्या राहत नाही,
असा हा प्रचंड प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लासभर उसाचा रस. रस आपल्याला आणायचा आहे त्यानंतर तो रस उकळायला ठेवायचा आहे. याच्यासाठी आपल्या स्टीलचे भांडण वापरायचे आहे. ॲल्युमिनियमचे, तांब्याचं, पितळाचे भांडे याच्यासाठी वापरायचं नाही. सुक्का मेवा जो असतो त्यात अंजीर मिळतो.
तो अंजीर चार ते पाच आपल्याला त्या एक ग्लास उसाच्या रसामध्ये टाकायचे आहे. अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचा आहे त्याच्यामधील जे अंजीर आहे ते पूर्णपणे फुगतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण औ-षधी गुणधर्म ही निर्माण होतो. हे जे अंजीर आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि रस टाकून द्यायचा आहे. सकाळी उपाशीपोटी ते अंजीर आपल्याला खायचे आहेत,
त्या नंतर पाच ते दहा मिनिट पाणी प्यायचं नाही. र-क्त पडायचं तात्काळ थांबून जात, वेदना सुद्धा थांबून जातात. उतरण आणि साडोराणी ही वनस्पती मूळव्याधीवर अत्यंत प्रभावी अशी वनस्पती आहे. कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असेल तर मगाशी सांगितल्या प्रमाणे या वनस्पतींच्या पानांचा अर्क काढून त्याने मूळव्याध असलेली जागा जर धुवून काढली तर होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.