मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
जेजुरी गडाचे एक रहस्य ! जुन्या जेजुरी गडावरून खंडोबा देव नवीन गडावर कसे आले? आजही त्याठिकाणी खंडोबा..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण महाराष्ट्रातील पुणे जि ल्ह्यातील जे जुरी मध्ये असणाऱ्या आणि महाराष्ट्राचे कु ल दै वत असणाऱ्या खं डो बाची माहिती सांगितली जाते. महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमधील देव विठ्ठल, कोल्हापूरचा जोतिबा आणि जेजुरीचा खंडोबा याचे लाखो भक्त आहेत. पण तुम्हाला नवीन जेजुरी व जुनी जेजुरी याबद्दल माहिती आहे का?आणि जुन्या जेजुरीवरून म्हणजे कडेपठारावरून देव नवीन जेजुरीवर कसा आला याबद्दल ही एक कथा आहे.

खूप वर्षांपूर्वी सुपे पारगणामध्ये खैरे नावाचे भक्त राहत होते आणि ते खंडोबा देवाचे भक्त होते. तर दररोज करेच पाणी घेऊन जुन्या गडावर म्हणजे कडेपठारावर जात होते आणि दररोज देवाला करेचे पाणी घालत होते. देवाची पूजा अर्चा करणे हा त्यांचा नित्यक्रम होता.आता त्यांचं वय झालं होतं त्यामुळे त्यांना तेथे जाऊन पूजा करणे शक्य होत न्हवत.

त्यामुळे ते एकदा पूजेसाठी गेले असता देवाला म्हणाले मला आता तुझी पूजा करणे शक्य नाही तू माझ्या घरी चल तेव्हा देवाने त्यांचे हे म्हणणे मान्य केले व देव त्याला म्हणाले की मी तुझ्यासोबत येतो पण तू जाऊपर्यंत कुठेही मागे वळून बघायचं नाही, ज्या ठिकाणी तू मागे वळून बघशील त्याच ठिकाणी मी थांबेन. तेव्हा खैरे पुढे जात होते व देव पाठीमागे होते, पुढे जात असताना नवीन गडावर गेल्यावर खैरे यांना शंका आली की देव येत तर आहेत ना व त्याने मागे वळून पाहिले व देव तिथेच थांबला.

तेव्हापासून खंडोबा देवाचे वास्तव्य हे मल्हारी मार्तंड या गडावर झाले व त्यांचे मंदिरही तेथेच बांधण्यात आले त्यालाच नवीन जेजुरीगड असे म्हणले जाते. अजून एक कथा याबद्दल आहे की खंडोबा हे कडेपठारावर का आले, खंडोबा हे महादेवाचा अवतार आहेत. खुप वर्षे आधी लवथळेशवर या ठिकाणी डोंगरावर मोठे ऋषीमुनी राहत होते आणि त्या ऋषीमुनींना दोन रा क्षस मनी आणि मल्ल यांनी त्रा स द्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांनी लवथळेशवर येथे शंकराची आराधना केली.

तेव्हा महादेव यांनी खंडोबा याचा अवतार घेऊन तेथे प्रकट झाले आणि त्यांनी काळभैरवाचा अवतार घेतला, हाती खडग घेतलं आणि जुन्या पठारावर म्हणजे कडेपठारावर त्या राक्षसांचा व ध केला. म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत आणि मनी व मल्ल यांचा व ध केला म्हणून मल्हारी ही नावं प्रचलित आहेत.कालभैरव म्हणजे मार्तंड भैरवाच्या दोन पत्नी आहेत एक म्हाळसा जी लिं गायत स माजाची होती आणि लिं गायत स माज हा नेवाशी या ठिकाणी होता.

निवाशी या ठिकाणी मोठे व्यापारी होते आणि आपल्या मुलीचे लग्न खंडोबाशी झाले असे त्यांना स्वप्न पडले. तेव्हा ते देवा कडे गेले व म्हाळसा आणि खंडोबाचे लग्न ठरले आणि पौर्णिमेला पाली या ठिकाणी लग्न झाले. पण पुढे काही काळातच धनगरांची मुलगी बानू ही खंडोबाला दर्शनाला आली तेव्हा देवाने तिला बघितलं आणि दोघांचे प्रेम झाले आणि देवाला बाणाईसोबत लग्न करायचे होते पण लग्न करणार कसे?

मग एक दिवस म्हाळसेसोबत सारिपाठचा डाव ठरला तेव्हा म्हाळसेने वचन दिले की देवाने हा डाव हरला तर त्यांना बारा वर्षे वनवास करावा लागेल आणि तसच झालं देव सारिपाठाचा डाव हरले व वनवासात निघून गेले. नंतर देव वेगळे रूप घेऊन बाणाईच्या घरी गेले व त्यांच्या बाबांची मेंढरे सांभाळू लागले. एक दिवस त्यांनी सर्व मेंढरे मा रून टाकली व बाणाईच्या बाबांना म्हणाले की तू तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून दे मगच ही मेंढरे जिवंत होतील.

यामुळे बाणाई व खंडोबाचे लग्न झाले अशी कथा सांगितली जाते. सर्व हिं दू ध र्माचे लोक हे या देवाची अतिशय भक्ती करतात व वर्षातून एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो हि माहिती तुम्हाला आधी माहिती होती का तुम्हाला हि माहिती वाचून कशी वाटली हे नक्की सांगा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.