9 मे रविवार: स्वामींची पुण्यतिथी स्वामींसमोर ठेवा ही 1 वस्तू, दुःख दूर होतील..प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो..

भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्र भरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात.

पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. यंदा 9 मे या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त नामजपासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदा को-रो ना व्हा-यरस सं-कटामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स-मस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.

स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-ध-र्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत.

सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. स्वामींची पुण्यतिथी म्हणजे सेवेसाठी विशेष पर्व असते. स्वामींची जे सेवा करतील त्यांना भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामींनी सांगितले आहे.

या विशेष दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींच्या पूजेनंतर एक फळ तुम्हाला स्वामींसमोर सकाळ पासून ते उद्या सकाळपर्यंत ठेवायचं आहे, जेणेकरून तेथील सकारात्मक लहरी त्यामध्ये प्रवेश करतील व त्याचा अधिक लाभ तुम्हाला होईल. ही वस्तू म्हणजे एक फळ, सुक्या खोबऱ्याची वाटी होय.

घरातील असो किंवा बाजारातून विकत आणली तरी चालेल, पण ही सुक्या खोबऱ्याची वाटी स्वामींसमोर ठेवा व श्रद्धेने भजन, जप, जयघोष करा. जर तुम्हाला शक्य असेल तर एक किंवा पाच फळे तुम्ही आणू शकता व नैवेद्य म्हणून स्वामींच्या चरणी अर्पण करा.

ही फळं सुद्धा त्या दिवशी दिवसभर ठेऊन उद्या सकाळी घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्या. खोबऱ्याची वाटी असो किंवा फळ असो ते दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून सेवन करा. असे केल्याने तुमच्या घरात, मनात शांती येईल व तुमच्या जीवनातील दुःख नाहीशी होतील.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *