मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
जर वाटत असेल की चंचल लक्ष्मी सदैव आपल्या घरी स्थिर राहावी..तर दर शुक्रवारी करा हे उपाय..

चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी.

घरातील वातावरण कसे असावे. लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही. ही प्रत्येकाचीच इच्छा असते. सर्व लोक आयुष्यभर या लक्ष्मीसाठीच राबत असतात.

लक्ष्मी कष्टसाध्य असते हे तर खरेच; पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांची इच्छा असते. चंचल लक्ष्मी घरात कायमच राहावी यासाठी..

​तुपाचा दिवा:- शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी नारायणासमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर होऊ शकते. सायंकाळी घरातील देवासमोर दिवा लावणे ही आपल्याकडील अत्यंत प्राचीन परंपरा आहे. जेथे ज्योति, तेथे लक्ष्मी अशी आपल्याकडे मान्यता आहे.

देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते अशी मान्यता आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे घरातील वातावरण पवित्र होते, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी विष्णुसहस्रनामाचे पठण करणे अत्यंत उपयुक्त मानले जाते.

कर्जाचे व्यवहार नको:- शुक्रवारी कोणत्याही प्रकारचे कर्ज व्यवहार करू नये, असे सांगितले जाते. कोणाकडूनही कर्जाची रक्कम घेऊ नये. तसेच कोणालाही कर्ज देऊ नये असे सांगितले जाते. या दिवशी केलेले कर्ज व्यवहार नुकसानकारक ठरू शकतात.

आपण कर्ज घेतले, तर ते फेडण्यासाठी स’मस्या उद्भवू शकतात. तसेच एखाद्या व्यक्तीला कर्ज स्वरुपात दिलेली रक्कम परत मिळणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे या दिवशी कर्ज व्यवहार टाळावेत असे सांगितले जाते.

​हळदीचा वापर:- शुक्रवारी हळकुंडाचा एखादा छोटा तुकडा आणि केळीच्या झाडाच्या मूळाचा काही भाग एकत्रित करावा आणि तो पिवळ्या कापडात गुं’डा’ळू’न उजव्या खांद्याला ताविजाप्रमाणे बांधावा. असे करणे उपयुक्त असल्याचे मानले जाते.

गुरुचे रत्न मानल्या गेलेल्या पुष्कराजप्रमाणे ते काम करते, अशी मान्यता आहे. असे केल्याने कु’टुंबात शुभ घ’टना घडायला सुरुवात होते, अशी मान्यता आहे. तसेच लक्ष्मी देवीचा शुभाशिर्वाद प्राप्त होऊन धन, ऐश्वर्य, वैभव, समृद्धी यात वाढ होते, असेही सांगितले जाते.

पिवळे वस्त्र:- शुक्रवारी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळे रंगाचे कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे शक्य नसल्यास पिवळ्या रंगाचा हातरुमाल जवळ बाळगावा.

केशरमिश्रित हळदीचा बारीकसा टिळा ललाटी लावावा. यामुळे आपल्या भाग्याला बळ मिळते. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देते. हाती घेतलेल्या कामात यश मिळते. तसेच प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले गेले आहे.

ज्येष्ठांचे आशीर्वाद:- शुक्रवारी कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे किंवा गुरुचे आशीर्वाद अवश्य घ्यावेत, असे सांगितले जाते. मातृदेवो भव:, पितृदेवो भव:, आचार्य देवो भव:, हा आपल्या संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहे.

त्यामुळे घरातील मोठ्या माणसांचे आशीर्वाद हाती घेतल्याने कामात यश मिळते. आपल्या प्रगतीचे मार्ग सुकर होतात, असे मानले जाते. आपल्याकडे गुरुला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातही गुरुची महती अधोरेखित करण्यात आली आहे.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.