मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
तुळजा भवानी मंदिराचे ‘हे’ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना देखील समजले नाही..स्वताच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..”जाणून घ्या” अद्भुत रहस्य..

मित्रांनो, भारतात असे एक मंदिर आहे, जिथे एक दगड ठेवला गेला आहे. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की आपण जर या दगडावर हाथ ठेवून आपल्या मनात एक प्रश्न विचाराल तर हा दगड रहस्यमयरित्या आपल्या मनातल्या त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्याच वेळी देतो.

हो, हे खरे आहे. मित्रांनो या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी शोध केले आहेत. पण याचे हे रहस्य आजपर्यंत कोणाला समजले नाही की हा दगड इथे कसा काय आला असेल आणि त्याला इथे कोण ठेवले असेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा दगड एखाद्या व्यक्तीचे मन जाणून कसे काय त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असेल हे कोणालाही कळत नाही.

नमस्कार मित्रांनो, मराठी समुदायच्या या लेखात आपले स्वागत आहे. आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे एक रहस्य जाणून घेणार आहोत. तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देखील मानले जाते.

आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानी मातेवर मोठी आस्था आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडे तीन शक्तीपीठातील एक पीठ आहे. तुळजाभावनी मातेचे वर्तमान मंदिर हे 70 च्या दशकातील आहे असे मानले जाते.

मंदिराच्या ठीक मागे हा रहस्यमय दगड आहे. ज्यास चिंतामणी दगड असे म्हणले जाते. हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकतो. फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हाथ या दगडावर ठेवायचे आहेत.

यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारयचा आहे. यानंतर जे घडते ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो मध्ये आहे तर हा दगड उजव्या बाजूला वळतो.

आणि जर प्रश्नाचे उत्तर नाही मध्ये असेल तर दगड डावी कडे वळू लागतो. आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो. आपण देखील स्वतः या मंदिरात येवून हे आश्चर्य स्वताच्या डोळ्याने पाहू शकता. पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरा वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही. यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते.

तर आपल्याला आजची रहस्यमय माहिती कशी वाटली कृपया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर आपण देखील या मंदिरास भेट दिली असल्यास आपल्याला काय अनुभव आला हे देखील कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना ही रहस्यमय माहिती शेअर करा. जय आई तुळजाभवानी..

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.