नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो भारतात एक अस मंदिर आहे जिथे एक रहस्यमय दगड ठेवला आहे. हो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही या दगडावर हात ठेवाल आणि मनातल्या मनात एखादा प्रश्न विचाराल तर हा दगड रहस्यमय पद्धतीने त्याचवेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल, आणि हे खरं आहे. आज आपण तुळजाभवानी मंदिरातील रहस्य जाणून घेऊया याबद्दल आपल्यापैकी काहींना माहिती नाही.
या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे पण याचे रहस्य आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. हा दगड कुठून आला आणि तो दगड इथे कोणी ठेवला आणि तो आपल्या प्रश्नांची उत्तरे कस देतो हे ही एक रहस्यच आहे. आपल्या भारत देशात महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे एक प्राचीन मंदिर आहे ज्याला तुळजाभवानी मंदिर म्हणतात.
तुळजाभवानी देवीला शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणलं जात. आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानी देवीवर खुप श्रद्धा आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्ती पिठांपैकी एक आहे आणि देशातील ५१ शक्तिपीठांपैकी एक देवी मानले जाते.
तुळजाभवानी म्हैसासुरमर्दिनीचे एक रूप आहे. तुळजाभवानी मंदिराची स्थापना १७ व्या शतकातील सांगितले जाते आणि हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणून तुळजाभवानी देवीला ओळखले जाते. प्रत्येक यु ध्दावेळी शिवाजी महाराज या मंदिरात देवीचा आशीर्वाद घ्यायला येत होते.
देवीने प्रसन्न होऊन ध र्माची रक्षा करण्यासाठी शिवाजी महाराजांना त लवार दिली. या तलवारीनेच शिवाजी महाराजांनी अनेक यु द्ध जिंकले आणि आता ही तलवार लंडनच्या संग्रहालयात आहे. या मंदिरात चांदीचा स्तंभ आहे त्याच्याविषयी लोकांना विश्वास आहे की जर कोणत्याही व्यक्तीला शा री रिक व्याधी असेल किंवा श रीर दुखत असेल तर त्या व्यक्तीने रोज ७ दिवस या स्थंबाचा स्पर्श केला तर त्याचा सर्व त्रा स कमी होतो.
या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे पण इथल्या लोकाच्या बोलण्यावरून तर ते खरेच वाटते. या मंदिरामध्ये अजून एक अस रहस्य आहे ज्यावर न्युज चॅनेल वाले तसेच वै ज्ञानिकांनी ही शोध केला आहे. या मंदिराच्या पाठीमागे एक दगड ठेवलेला आहे ज्याचे नाव आहे चिंतामणी दगड. हा दगड तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.
तुम्हाला फक्त या दगडावर एक सिक्का ठेऊन दोन्ही हात त्या दगडावर ठेवावे लागतात आणि मनातच दगडाला एक प्रश्न विचारावा लागतो एवढंच आणि त्यानंतर जे होते ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. जर तुमचे उत्तर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला सरकतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो दगड डाव्या बाजूला सरकतो आणि जर दगड हलत नसेल तर याचा अर्थ असतो की उत्तर येण्यास अजून प्रतीक्षा करावी लागेल.
पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरा वळतो हे कोणत्याही वै ज्ञानिकाना आज पर्यंत जाणून घेता आले नाही. यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते. मित्रांनो शिवाजी महाराज जेव्हा यु द्धाला जात होते तेव्हा त्यांनाही काही दुविधा असेल तर तेही या दगडाची मदत घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे घेत होते. तुम्हालाही हे पटत नसेल तर जरूर या मंदिराला भेट द्या आणि चमत्कार बघा..